महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय
उरुळी कांचन
७४ वा स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट २०२०
महाविद्यालयीन निबंध स्पर्धा
नमस्कार, सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करीत आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये जरी महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग सुरु नसले तरी विद्यार्थ्यांच्या ज्ञान वृध्दीसाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत.
म्हणून ही ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करीत आहोत. स्पर्धा कालावधी – दि. १५/०८/२०२० ते २२/०८/२०२०.
निबंधासाठी विषय –
1. ऑनलाईन शिक्षण की सर्वांगीण शिक्षण
2. कोरोनानंतरचे जगणे
3. नवीन शैक्षणिक धोरण – संधी आणि आव्हाने
4. आत्मनिर्भर भारत
नियम व अटी
1. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांनाही सहभागी होता येईल.
2. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्र देण्यात येईल.
3. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
शब्द मर्यादा – १००० शब्द
नावनोंदणी साठी
1. ऑनलाईन गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल. या फॉर्म वर रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.
2. आपले निबंध मराठीमध्ये हस्तलिखित करून त्याचा फोटो प्रा. आबनावे एस. व्ही. ९७६७२००३७८ या Whatsapp नंबर वर पाठवावा.
3. आपल्या हस्तलिखितामध्ये आपले नाव, वर्ग / वय, इमेल पत्ता याचा उल्लेख करावा.
प्राचार्य
डॉ. आर. के. अडसूळ