Admission Procedure

प्रवेश प्रक्रिया

प्रथम वर्ष (F.Y.) कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, बी.सी.ए.

१. माहितीपत्रक महाविद्यालयातील कार्यालयातून घेणे. (सोबत सा.फु. पुणे विद्यापीठाचा प्रवेश पात्रता फॉर्म, अँटी रॅगिंग हमीपत्र, शिष्यवृत्ती हमीपत्र, फीचे  चलन)

२. प्रवेश फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून प्रिंट काढावी . Link for admission – http://pmdc.vriddhionline.com

३. प्रवेश फॉर्म सोबत CANARA बॅंकेचे दोन चलन मिळतील.चलन मिळाल्यानंतर चलनावर स्वतःचे पूर्ण नाव, वर्ग व ज्या वर्गात प्रवेश घेणार आहे त्या वर्गाची फी तपासूनच बँकेत जमा करावी.

४. बँकेत भरलेल्या चलनाची दोन प्रतीत झेरोक्स काढणे एक स्वतःजवळ ठेवून ओरीजनल चलन व १ झेरोक्स महाविद्यालय कार्यालयात प्रवेश फॉर्म सोबत जमा करावे.

५. वाणिज्य,विज्ञान,संगणक शास्त्र व बी.सी.ए.या वर्गासाठी सर्व विषय अनिवार्य आहेत.

६. कला विभागासाठी प्रवेश घेताना विषयांची निवड करताना खालील प्रमाणे करावी. एकूण ६ विषय निवडायचे आहेत. त्या पैकी कंपल्सरी इंग्लिश हा विषय अनिवार्य आहे. त्यानंतर इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मराठी, वैकल्पीक इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यापैकी ५ विषय निवडायचे आहेत. त्यामध्ये समाजशास्त्र      किंवा     मानसशास्त्र, वैकल्पीक इंग्रजी  किंवा मराठी, अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र असे विषय निवडावेत. एकाच वेळी समाजशास्त्र व मानसशास्त्र दोन्ही घेता येणार नाहीत. एकाच वेळी वैकल्पीक इंग्रजी व मराठी दोन्ही घेता येणार नाहीत. एकाच वेळी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र दोन्ही घेता येणार नाहीत.

७) एकदा निवडलेले विषय पुन्हा बदलता येणार नाहीत त्यामुळे विषय भरताना काळजीपूर्वक भरावेत.

८) प्रवेश घेताना खालील कागदपात्रांची पूर्तता करावी.

 • इ.१२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रकाच्या २ प्रती
 • स इ.१२ वी उत्तीर्ण झालेल्या मुळ दाखला २ प्रती
 • बँकेत भरलेल्या चलनाची १ प्रत
 • आवश्यक असल्यास गॅप सर्टिफ़िकेट २ प्रती
 • पासपोर्ट साईज नवीन १ फोटो
 • आधारकार्ड १ प्रत

बॅंकेचे चलन जमा करताना कॅनरा बँक, शाखा उरुळी कांचन , शिंदवणे रोड, ता. हवेली जि. पुणे याच बँकेत रोख रकमेनेच भरावा. चेक अथवा डी.डी.भरू नये.

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्म महाविद्यालयामध्ये सबमिट केल्यानंतरच प्रवेश निश्चित होईल.

द्वितीय वर्ष (S.Y.) कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, बी.सी.ए.

 1. माहितीपत्रक महाविद्यालयातील कार्यालयातून घेणे. (सोबत अँटी रॅगिंग हमीपत्र, शिष्यवृत्ती हमीपत्र, फी चे चलन)
 2. प्रवेश फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून प्रिंट काढावी . http://pmdc.vriddhionline.com
 3. प्रथम वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण अथवा ए.टी.के.टी. असावेत.
 4. प्रवेश फॉर्म सोबत CANARA बॅंकेचे दोन चलन मिळतील. चलन मिळाल्यानंतर चलनावर स्वतःचे पूर्ण नाव ,वर्ग व ज्या वर्गात प्रवेश घेणार आहे त्या वर्गाची फी तपासूनच बँकेत जमा करावी.
 5. बँकेत भरलेल्या चलनाची दोन प्रती काढणे एक स्वतःजवळ ठेवून ओरीजनल चलन व १ प्रत  महाविद्यालय कार्यालयात प्रवेश फॉर्म सोबत जमा करावे.
 6. संगणक शास्त्र व बी.सी.ए.या वर्गासाठी माहितीपत्रकामध्ये दिलेले सर्व विषय अनिवार्य आहेत.
 7. कला, वाणिज्य, विज्ञान या वर्गासाठी प्रवेश घेताना विषयांची निवड करताना नियमाप्रमाणे भरावे.
 8. प्रथम वर्षास जे विषय असतील तेच विषय द्वितीय वर्गामध्ये घेता येतील विषय बदल करता येणार नाही.
 9. प्रवेश घेताना खालील कागदपात्रांची पूर्तता करावी.
  1. प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रकाच्या २ प्रती
  2. दुसऱ्या महाविद्यालयातील प्रवेश असेल तर प्रथम वर्ष उत्तीर्ण असलेला मूळ T.C. सोबत २ प्रती व १२ वी उत्तीर्ण झालेल्या दाखल्याच्या २ प्रती
  3. बँकेत भरलेल्या चलनाची १ प्रत
  4. आवश्यक असल्यास गॅप सर्टिफ़िकेट २ प्रती
  5. आधारकार्ड १ प्रत

बॅंकेचे चलन जमा करताना कॅनरा बँक, शाखा उरुळी कांचन , शिंदवणे रोड, ता. हवेली जि. पुणे याच बँकेत रोख रकमेनेच भरावा.चेक अथवा डी.डी.भरू नये.

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्म महाविद्यालयामध्ये सबमिट केल्यानंतरच प्रवेश निश्चित होईल.

तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान,संगणकशास्त्र,बी.सी.ए.

 1. माहितीपत्रक महाविद्यालयातील कार्यालयातून घेणे. (सोबत अँटी रॅगिंग हमीपत्र, शिष्यवृत्ती हमीपत्र, फी चे चलन)
 2. प्रवेश फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून प्रिंट काढावी .
 3. प्रथम वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण व द्वितीय सर्व विषय उत्तीर्ण अथवा ए.टी.के.के.टी.   असावेत.
 4. प्रवेश फॉर्म सोबत CANARA बॅंकेचे दोन चलन मिळतील. चलन मिळाल्यानंतर चलनावर स्वतःचे पूर्ण नाव ,वर्ग व ज्या वर्गात प्रवेश घेणार आहे त्या वर्गाची फी तपासूनच बँकेत जमा करावी.
 5. बँकेत भरलेल्या चलनाची दोन प्रती काढणे एक स्वतःजवळ ठेवून ओरीजनल चलन व १ प्रत  महाविद्यालय कार्यालयात प्रवेश फॉर्म सोबत जमा करावे.
 6. संगणक शास्त्र व बी.सी.ए.या वर्गासाठी माहितीपत्रकामध्ये दिलेले सर्व विषय अनिवार्य आहेत.
 7. कला, वाणिज्य, विज्ञान या वर्गासाठी प्रवेश घेताना विषयांची निवड करताना नियमाप्रमाणे भरावे.
 8. द्वितीय वर्षास जे विषय असतील तेच विषय तृतीय वर्गामध्ये घेता येतील विषय बदल करता येणार नाही.
 9. प्रवेश घेताना खालील कागदपात्रांची पूर्तता करावी.
  1. प्रथम व द्वितीय वर्ष उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रकाच्या २ प्रती
  2. दुसऱ्या महाविद्यालयातील प्रवेश असेल तर प्रथम वर्ष उत्तीर्ण असलेला मूळ T.C. सोबत २ प्रती व १२ वी उत्तीर्ण झालेल्या दाखल्याच्या २ प्रती
  3. बँकेत भरलेल्या चलनाची १ प्रत
  4. आवश्यक असल्यास गॅप सर्टिफ़िकेट २ प्रती
  5. आधारकार्ड १ प्रत

बॅंकेचे चलन जमा करताना कॅनरा बँक, शाखा उरुळी कांचन , शिंदवणे रोड, ता. हवेली जि. पुणे याच बँकेत रोख रकमेनेच भरावा.चेक अथवा डी.डी.भरू नये.

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्म महाविद्यालयामध्ये सबमिट केल्यानंतरच प्रवेश निश्चित होईल.

Online Admission Procedure

You have to fill the online registration form to get admission to your desired course. http://pmdc.vriddhionline.com

When you fill the Online Form, you have to create unique login id and password. With your login-id and password you will be able to sign in to this website and maintain your account. You will upload your information and photograph. You can edit your information at any time using your Login-Id and password. After filling the form you can take print out of the form which you will submit to the college.

Please keep your log-in id and password safe for future reference. You can change your information at any time using this log-in id and password by clicking Your Account link given below.

This admission is Provisional Admission, you have to confirm it by paying the fees at Canara Bank. Please, show the paid challan at college office and get admission confirmed. Then you can take the final printout of the form. Please submit this final form at the college office.

You must have following information with you for filling the form:

 • Aadhar Card Number
 • Percentage of marks you secured in your last examination.
 • I-Card size photo, scanned in jpeg form to upload. Image size should be less than 100 KB.
 • Correct date of birth.
 • Name as per S.S.C. / H.S.C. mark list.

Submission

After filling the form online. Please take the printout of the form. Please submit the print of the form to the college office with required documents.

The Documents required

 • Two Photocopies of the mark list of the last examination passed.
 • In case of admissions to First Year Original Leaving Certificate issued by the school last studied and two copies of it.
 • Photocopy of Aadhar Card.
 • Two Photocopies of the filled Bank challan.
 • If applicable, two photocopies of Gap Certificate.
 • Passport Size Photograph (Latest).