सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की , गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, मेहंदी व चित्रकला, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी नियम व अटी खालील प्रमाणे-१. स्पर्धा शनिवार दि. 3 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत महाविद्यालयात घेतली जाईल.२. एका स्पर्धेसाठी स्पर्धकाला एका तासाचा (१तास) वेळ दिला जाईल.३. स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाने आपणास आवश्यक असणारे साहित्य स्वखर्चाने आणावयाचे आहे.४. स्पर्धेचे नियम व निर्णय प्रत्येक स्पर्धकाला बंधनकारक राहतील.५. स्पर्धेच्या काळात शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.६. परीक्षकाचा निर्णय स्पर्धकाला बंधनकारक राहील.
समन्वयक
प्रा. रानवडे एस. ए.